आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षरधाम हे मंदिर आधुनिक तंत्रज्ञान, परंपरेचे उत्तम प्रतिक : पंतप्रधान मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर (गुजरात) - अक्षरधाम मंदिर हे आधुनिक तंत्रज्ञान, परंपरेचे उत्तम प्रतिक असून सामाजिक चेतनेचे केंद्र असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. ते अक्षरधाम मंदिराच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात पोहचले  असून त्यांनी स्वामी नारायण यांचे दर्शन घेतले आहे.  सनातनम प्रदर्शन यावेळी पाहणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अडीच महिन्यानंतर येथे आले आहेत. यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी ते आले होते.
 
- पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी पाच वाजता हवाई दलाच्या विशेष विमानाने येथे पोहचले. त्यांनी यावेळी लाईट आणि साऊंड शो देखील पाहिला.
- थोड्याच वेळात मोदी हे 25 हजार हरिभक्तांना संबोधित करणार आहेत.
- मोदी 15 ऑगस्ट रोजी गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी ते स्वामीनारायण संप्रदायाच्या प्रमुख स्वामींच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यासाठी अक्षरधाम मंदिरात गेले होते. त्यांनी स्वामीजी हे आपल्याला पित्यासमान असल्याचे यावेळी सांगितले. त्यांनी सांगितले की प्रमुख स्वामी त्यांच्यावर खूप प्रेम करायचे.
- स्वामीनारायण संप्रदायाचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत. यात खूप मोठी संख्या ही पाटीदारांची आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हा समुदाय भाजपवर नाराज आहे. हार्दिक पटेल हे काँग्रेसचे समर्थन करण्याची दाट शक्यता आहे.   
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...