आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Nitin Patel Poverty Statement Latest News

परप्रांतियांमुळे गुजरातमध्ये गरीबी वाढली, गुजरातच्या अर्थमंत्र्यांनी मांडला अजब तर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातचे अर्थमंत्री नितीन पटेल यांनी गुजरातच्या दारिद्र रेषेच्या मुद्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, बिहार, उत्तरप्रदेश, ओडिसा या राज्यातील लोकांचा गुजरातमध्ये रोजगारासाठी लोंढा वाढला आहे. परप्रांतिय येथे आले नसते तर, गुजरातमधील लोकांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळाल्या असत्या. तर, दुसरीकडे अहमद पटेल यांनी दुस-या राज्यातून आलेल्या लोकांना गुजरात सरकार दारिद्रय रेषेचे कार्ड (बीपीएल) देते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
असा सुरु झाला वाद
गुजरातमधील दारिद्रय रेषेचा वाद गुजरात अन्न व नागरी पुरवठा विभागाने जारी केलेल्या एका जीआरमुळे सुरु झाला आहे. यात दररोज 10 रुपये 80 पैसे कमाई असलेली व्यक्ती गरीबी रेषेच्या वर असल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, काँग्रेसच्या निशाण्यावर मोदी