आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat On High Alert After Pakistan Warns India Of Terrorist Attack Two Nsg Teams Reach State

जैश-तोयबाचे 10 अतिरेकी घुसले; महाशिवरात्रीनिमित्त देशभर अलर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- भारतात महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी गुजरातच्या सागरी मार्गाने पाकिस्तानातून आठ ते दहा दहशतवादी देशात घुसले असल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाल्यानंतर सर्वत्र सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सोमवारी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर गुजरातेतील सोमनाथ मंदिर तर राष्ट्रीय सुरक्षा पथकाच्या (एनएसजी) ताब्यात देण्यात आले आहे. याशिवाय अक्षरधाम मंदिरासह सर्वच ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पाकिस्तानातून निघालेले जैश-ए-महंमद व लष्कर-ए-तोयबा या संघटनांचे हे दहशतवादी पश्चिमेकडील सागरी मार्गाने भारतात दाखल झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन मेहता यांनी राज्यात सुरक्षा कडक करण्यात आली असल्याचे सांगून भीतीचे कारण नसल्याचे स्पष्ट केले.

ते दहशतवादीच...
भारत-पाक सीमेलगत कच्छ परिसरात समुद्रकिनारी कोटेश्वर क्रिकमध्ये सुरक्षा रक्षकांच्या नजरेस पडताच मासेमारी करणाऱ्या एका नावेतील लोक पळून गेले होते. यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या पथकाने याच भागात अनेक बेवारस नावा जप्त केल्या. या नावेत मच्छीमार होते की दहशतवादी याचा तपास लागू शकलेला नाही.

गुजरातवर अधिक लक्ष
>राज्यात पोलिसांच्या सुट्या रद्द
>केंद्रीय सुरक्षा दलांचे जवानही राज्यात दाखल
> संशयित ठिकाणी तपासणी मोहीम
>जागोजाग वाहने तपासली जात आहेत.
>राजधानी दिल्लीतही बंदोबस्त
>सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश

कोलकात्यात खळबळ
कोलकात्यात बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या २४ तासांत उडवून दिले जाईल, अशी धमकी देणारा मेल आल्याने बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. व्यवस्थापकांना हा मेल मिळाला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मराठवाड्यातील तिन्ही ज्योतिर्लिंगांत सतर्कता