आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभेच्या परवानगीसाठी पोलिसांचे 40 प्रश्न, मागितली 'रखेली' आणि 'प्रेमिकां'ची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभेच्या परवानगीसाठी पोलिसांची प्रश्नावली. चौकटीत रखेली आणि प्रेमिकांसंबंधीची माहिती विचारण्यात आलेला प्रश्न. - Divya Marathi
सभेच्या परवानगीसाठी पोलिसांची प्रश्नावली. चौकटीत रखेली आणि प्रेमिकांसंबंधीची माहिती विचारण्यात आलेला प्रश्न.
सूरत- गुजरातमधील पाटीदार (पटेल) समाज ओबीसीमध्ये समावेश व्हावा यासाठी आंदोलन करत आहे. 17 ऑगस्ट रोजी त्यांनी सूरतमध्ये सभेचे आयोजन केले आहे. त्यासाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज केला आहे. पोलिसांनी त्यांना एक फॉर्म दिला त्यात त्यांना 40 प्रश्न विचारण्यात आले आहेत. हे प्रश्न वाचल्यानंतर भीक नको पण कुत्रा आवर असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यावर येते. 39 क्रमांकावरील प्रश्नात विचारण्यात आले आहे, की आंदोलकांच्या 'रखेली' किती आणि 'प्रेमिका' किती आहेत.
फॉर्म भरुन घेतला पण स्वाक्षरी नाही
आंदोलनासाठी पोलिस परवानगी देत असताना पोलिसांनी फॉर्मतर भरून घेतला, परंतू त्याची रिश्यूड कॉपी (पोच पावती) देण्यास नकार दिला. लोकांचा आरोप आहे, की पोलिस अनेक प्रश्न विचारून जनतेची खासगी माहिती गोळा करत आहे.
ही देखील माहिती पाहिजे
फॉर्ममध्ये पालक, पती-पत्नी, भाऊ-बहिण, सासू-सासरे, काका-काकू, मावशी-काका, मामा-मामी, आत्या-मामा आणि मेव्हणा-मेव्हणी यांची देखील माहिती विचारण्यात येत आहे. एवढेच नाही तर, आंदोलकांपैकी कोणाचे नातेवाईक किंवा कुटुंबातील सदस्य पोलिस किंवा राजकीय पक्षात असल्यास त्याची संपूर्ण माहिती विचारण्यात आली आहे.
सर्वसामान्यांना त्रासदायक काही प्रश्न
- बँक खात्यांची संपूर्ण माहिती
- फॅमिली डॉक्टरची संपूर्ण माहिती
- परिचयातील वकिलाचे नाव आणि पत्ता
- परिचयातील पोलिस खात्यातील व्यक्तीचे नाव आणि पत्ता
- कोणासोबत वैर असेल तर त्याचे पूर्ण नाव आणि पत्ता
- शरीरासंबंधी संपूर्ण माहिती, उदा. लांबी, रंग, डोळे, कान, नाक यांचा आकार, त्यासोबतच कोणता आजार असेल तर त्याची संपूर्ण माहिती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो...
बातम्या आणखी आहेत...