आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, गुजरातमध्ये रातोरात 400 लोक कसे झाले कोट्यधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातेतील साणंदजवळचे खोरज हे 1200 लोकसंख्येचे गाव. गावात राहतात 400 कोट्यधीश. त्यात 117 महिलांचा समावेश आहे. प्रसार माध्यमांनुसार अहमदाबादपासून 40 कि.मी.वरील खोरज हे देशातील सर्वाधिक कोट्यधीशांचे गाव ठरले आहे. विशेष म्हणजे हे सगळे रातोरात श्रीमंत झाले आहेत.
गुजरात औद्योगिक विकास महामंडळाने (जीआयडीसी) जमिनीच्या मोबदल्यात ग्रामस्थांना मावेजा दिला होता. काही दिवसांपूर्वी येथे 800 कोटी रुपयांचे धनादेश वाटण्यात आले.
गावात महिलांच्या नावेही बरीच शेती होती. त्यांनादेखील एक ते सहा कोटींपर्यंत मावेजा मिळाला आहे.
ग्रीन हाऊस काढणार : कल्याणी जाधव
कल्याणी जाधव यांना 1.85 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांची आई लीला यांना 2.43 कोटी, तर वडील रामसिंह यांना 3.5 कोटी मिळाले आहेत. कल्याणी यांना व्यवसाय करायचा आहे. ग्रीन हाऊसची उभारणी आणि कृषी प्रक्रियेचे काम त्या करणार आहेत.
मुलगा म्हणतो गाडी घ्या : ज्योत्स्ना
शेतीच्या बळावर दोन मुलांना लहानाचे मोठे करणार्‍या ज्योत्स्ना चावडा यांना 1.21 कोटी रुपये मिळाले आहेत. मुलगा एसयूव्ही कार घेण्यासाठी हट्ट करत आहे. परंतु विचारपूर्वक पैसे खर्च करणार आहे. मुलांच्या भविष्याची तजवीज करील, असे ज्योत्स्ना यांनी म्हटले आहे.