आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sedition Case Filed Against Hardik Patel For \'kill Policemen\' Remark

हार्दिक पटेल विरोधात राष्ट्रद्रोह आणि तिरंग्याचा अवमान केल्‍याचा गुन्‍हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
सुरत (गुजरात) - 'पटेल कधी आत्‍महत्‍या करत नाही. त्‍याऐवजी पोलिसांना ठार मारा', असा सल्‍ला पाटीदार पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी आपल्‍या कार्यकर्त्‍यांना दिला होता. त्‍यामुळे देशाविरुद्ध युद्धासाठी युवकांच्‍या भावना भडकावल्‍याचा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला. त्‍या आधारे आज (सोमवार) गुजरात पोलिसांनी हार्दिक यांच्‍या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्‍हा दाखल केला आहे. दरम्‍यान, दुसरीकडे हार्दिक यांनी राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान केल्‍याप्रकरणी राजकोट पोलिसांनीही गुन्‍हा दाखल केला. त्‍यामुळे हार्दिक यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत.
हार्दिक यांनी नेमके काय म्‍हटले होते
पाटीदार पटेल समाजाच्‍या आरक्षणासाठी काही युवा कार्यकर्त्‍यांनी सरकारला आत्‍महत्‍येची धमकी दिली होती. दरम्‍यान, हार्दिक यांनी 3 ऑक्‍टोबरला एका पटेल कुटुंबाची भेट घेतली आणि स्वतः आत्महत्या करण्यापेक्षा पोलिसांना ठार मारा, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला होता. या बाबतचा ऑडिओ पोलिसांना मिळाला होता. त्‍या आधारे पोलिसांनी आवाजाची चाचणी करून हार्दिक यांच्‍या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्‍हा दाखल केला आहे.
पुढे वाचा, कधी केला राष्‍ट्रध्‍वजाचा अवमान...