आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायटेक सेक्युरिटी तोडून प्लास्टिकच्या चावीने नोकराने चोरली आलिशान ऑडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद (गुजरात)- अॅंटी थेप्ट आणि सेक्युरिटी फिचर्समुळे आलिशान कार्सची मागणी वाढली आहे. परंतु, येथील एका नोकराने कारची हायटेक सेक्युरिटी तोडून मालकाची तब्बल 55 लाख रुपयांची ऑडी कार चोरुन नेली. कारच्या दोन्ही मुळ चाव्या मालकाकडे असल्याने आणि तो बाहेरगावी गेला असल्याने त्याला याची माहितीही मिळाली नाही. अहमदाबादच्या पोलिस ठाण्यात जेव्हा तक्रार नोंदविण्यात आली तेव्हा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही वाटले होते, की मालकाने बनावट तक्रार दिली आहे. पण एका महिन्याने कार सापडली. आता चोरटा नोकर फरार आहे.
नोकराने प्लास्टिकच्या चावीच्या मदतीने कार चोरुन नेली. पण कागदपत्रे नसल्याने त्याला ती विकता आली नाही. 55 लाखांची कार त्याने केवळ 15 लाख रुपयांना विकण्यास काढली होती. त्याला एक ग्राहक मिळालाही होता. पण कागदपत्रे नसल्याने त्याने अखेर नकार दिला.
का चोरली कार
आरोपी नोकराचे एका मुलीवर प्रेम आहे. तिचा साखरपुडा एका दुसऱ्या मुलासोबत होणार होता. या नोकराचाही साखरपुडा एका दुसऱ्या मुलीसोबत झाला आहे. पण त्याला ती मुलगी आवडत नाही. या मुलीसोबत झालेला साखरपुडा तोडण्यासाठी आणि नवीन लग्न करण्यासाठी या नोकराला 50 लाख रुपयांची गरज होती. त्यामुळे त्याने 55 लाखांची ऑडी चोरली होती.
पुढील स्लाईडवर बघा, कशी चोरली ऑडी....वाचा संपूर्ण कहाणी....