आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये इंटरस्टेट विमानसेवा सुरू, महाराष्ट्रानंतर बनले दुसरे राज्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादः राज्याचे उड्डाण मंत्री सौरभ पटेल यांनी आजपासून अहमदाबाद ते पोरबंदर, भुज आणि जामनगर अशा प्रकारे गुजरातमधील शहरांना जोडणारी विमान सेवा सुरू केली आहे. मेह एयर लाइन्सची पोरबंदर विमानातील प्रवाशांना बोर्डिंग पास देऊन सौरभ पटेल यांनी या सेवेची सुरूवात केली. या सेवेच्या सुरूवातीसोबतच गुजरात हे राज्यातल्या राज्यात विमानसेवा देणारे दुसरे राज्य बनले आहे.
गुजरातमध्ये ही विमानसेवा सुरू करताना राज्य उड्डाण मंत्री सौरभ पटेल म्हणाले की, "राज्यातल्या राज्यात विमानसेवा सुरू झाल्याने राज्यातील उद्योग आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल. येणाऱ्या काळात गुजरातच्या इतर शहरांना जोडणारी विमानसेवा सुध्दा सुरू करण्यात येईल." सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांतच द्वारका आणि अंबाजी यांच्या समवेत तिर्थस्थळांना जोडणारी विमानसेवाही सुरू करण्यात येईल.

मेह एयर लाइन्सने एका महिन्यासाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत अहमदाबाद ते पोरबंदरचे प्रवास भाडे 4999 एवढे ठेवण्यात आले आहे. हे दर 30 जानेवारीपर्यंतच असतील. त्यानंतर या दरांमध्ये बदल करण्यात येईल. अहमदाबादवरून दर मंगळवारी आणि गुरूवारी पोरबंदरसाठी विमान सोडण्यात येईल. अहमदाबाद अहमदाबादवरून दुपारी 2 वाजता हे विमान उड्डाण भरेल तर अवघ्या दीड तासात म्हणजेच दुपारी 3:30 वाजता ते पोरपंदरला पोहोचेल. तसेच हेच विमान पोरबंदरवरून संध्याकाळी 4 वाजता पुन्हा अहमदाबादकरीता उड्डाण भरेल आणि संध्याकाळी 5:30 वाजता अहमदाबादला येईल. पोरबंदरशिवाय भुज आणि जामनगरसाठीही अशा प्रकारच्या विमानसेवाचा लाभ घेता येऊ शकतो.
पुढील स्लाईडवर पाहा, या विमानसेवेचे इतर फोटो...