आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार वर्षांपासून विद्यार्थी चालवतात बँक, दीड लाख जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटण (गुजरात) - ही आहे शालेय विद्यार्थ्यांची बँक. लिपिक ते व्यवस्थापक या पदांची जबाबदारी मुलेच सांभाळतात. आतापर्यंत या बँकेत १ लाख ४० हजार रुपये जमा आहेत. तिसरी ते पाचवीचे विद्यार्थीच बँकेचे संचालन करतात.

मुलांमुळेच बँक अस्तित्वात आली. कुठलाही विद्यार्थी वार्षिक सहलीपासून वंचित राहू नये म्हणून ही बँक सुरू करण्यात आली. गुजरातमध्ये वर्षात एकदा शालेय विद्यार्थ्यांची कुठे ना कुठे सहल जाते. अनेकदा पैसे नसल्यामुळे काही मुले सहलीला जाऊ शकली नाहीत. वराणा प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना ही बाब खटकत होती.

अखेर २०११ मध्ये शाळेचे प्राचार्य मोहन पटेल यांनी बाल बँकेची योजना तयार केली. इतर शिक्षकही त्यासाठी राजी झाले. २६ जानेवारी २०११ ला शाळेची बाल बँक स्थापन झाली. नाव दिले ‘खोडियार बचत बँक.’ वराणाच्या प्राथमिक शाळेत ४५० पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. बँकेमुळे आता कोणीही विद्यार्थी सहलीपासून वंचित राहत नाही.

मोठा फायदा : पाचवीपर्यंत मुलांना मिळते बँकिंगचे ज्ञान
- पाचवी उत्तीर्ण होईपर्यंत मुलांना बँकिंग कार्यप्रणालीची माहिती होते.
- पैसे जमा करू न शकलेल्या कुठल्याही मुलाची सहल चुकत नाही. ते आधीपासूनच थोडेथोडे पैसे आपल्या खात्यात जमा करतात.
- बँकेचे बाल अधिकारी आणि कर्मचारी दरवर्षी बदलतात. सर्वांना संधी मिळते.
- शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर खातेधारक पैसे काढून खाते बंद करू शकतो.

सर्व काही बँकेप्रमाणे
- कमीत कमी पाच रुपये जमा करता येतात.
- आवश्यकतेनुसार पैसे काढता येतात.
- जमा, कर्ज, वसुली रजिस्टर व स्लिप आहेत.