आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Students Clean Dishes After Gunotsav Programme

गुजरात: कार्यक्रमातून CM गेल्‍यानंतर मुलांना धुवावी लागली भांडी, Photos Viral

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - आनंदीबेन पटेल शुक्रवारी राजकोट जिल्‍ह्यातील बेडला गावातील सरकारी शाळांमध्‍ये पोहोचल्‍या. त्‍यांनी मुलांना शिकवण्‍याचा आनंदच घेतला नाही, तर त्‍यांच्‍यासोबत दुपारचे जेवणही घेतले. ‘गुणोत्सव’ कार्यक्रमासाठी त्‍या एका शाळेत पोहोचल्‍या होत्‍या. मात्र मुख्‍यमंत्री निघून गेल्‍यावर विद्यार्थ्‍यांवर शाळेत भांडी घासण्‍याची वेळ आली.
बातमी समजताच सीएम यांनी काय घेतली भूमिका..
- विद्यार्थ्‍यांवर भांडी घासण्‍याची वेळ आली. ही बातमी ऐकल्‍यानंतर सीएम यांनी जिल्‍हाधिका-यांशी संपर्क केला.
- प्रकरणाचा तपास करून शाळा प्रशासनाविरोधात कारवाई करण्‍याचे आदेश त्‍यांनी दिले.
दोन तास मुलांसोबत होत्‍या सीएम..
- बेडला गावातील ‘गुणोत्सव’ कार्यक्रमासाठी मुख्‍यमंत्री आनंदीबेन या दुपारी शाळेत पोहोचल्‍या.
- प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला वेळ देत त्‍यांनी संवाद साधला.
- मुलांना गिफ्ट देऊन सुमारे 2 तासानंतर त्‍या गांधीनगरकडे निघाल्‍या.
- त्‍या गेल्‍यानंतर शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनाने मुलांना कामाला लावले.
- त्‍यानंतर गावातील काही युवकांनी या प्रकरणाचे फोटो घेतले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो...