सूरत(गुजरात)- सूरत केवराछामध्ये भाजपा युवा मोर्चाचे विजय टंकार सम्मेलनाला विरोध करण्यासाठी पोहोचलेल्या पाटीदार अनामत आंदोलन समिती(पास)च्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री उशीरा धुमाकूळ घातला. पाटीदार समाजाच्या कार्यकर्त्यांनी हीराबाग येथील सौराष्ट्र सोसायटीत सुरू असलेल्या एक कार्यक्रमात पोहोचून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्यांना थाबनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतप्त जमावाने पोलिसांवर टमाटे आणि दगडफेक केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आणि सुरत जवळील कन्वीनर अल्पेश कथिरिया आणि विजय मांगुकियासह 18 लोकांना ताब्यात घेतले. यामुळे संतप्त झालेल्या पाटीदार समाजाच्या 100 पेक्षा अधिक लोकांनी हीराबागजवळील बीआरटीएसच्या दोन बस पेटून दिल्या.
सात दिवसांपासून विरोधाचे संकेत...
- गेल्या 7 दिवसांत पाटीदारांचे भाजपविरोधात हे तिसरे मोठे आंदोलन होते.
- यापुर्वी गणेश चतुर्दशीला विसर्जन मिरवणूकीदरम्यान एकत्र आलेल्या पाटीदार समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.
- तसेच, रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करून निदर्शने करण्यात आली होती.
- यावेळी जमाव जय पाटीदार, जय सरदारच्या घोषणा देण्यात येत होत्या. या घटनेत एक पोलिस आधिकारी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
- रात्री सव्वानऊच्या आसपास सुरू झालेला गोंधळ जवळपास रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होता.