आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat To Give Reservations On Economic Criteria

गुजरातमध्‍ये आता आर्थिकदृष्‍ट्या मागासलेल्‍यांना 10 टक्‍के आरक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय रूपाणी, अमित शाह आणि आनंदीबेन पटेल - Divya Marathi
भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजय रूपाणी, अमित शाह आणि आनंदीबेन पटेल
अहमदाबाद - ज्‍या कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न 6 लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील सदस्‍यांना गुजरात सरकारने शिक्षण आणि नोकरीत आर्थिक निकषावर 10 टक्‍के आरक्षण देण्‍याची घोषणा केली. अशा प्रकारचा निर्णय घेणारे गुजरात हे देशातील पहिले राज्‍य बनले आहे.

कधीपासून होणार लागू...
> खुल्‍या प्रवर्गातील आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या सर्वच लोकांसाठी हे आरक्षण असणार असणार आहे.
> गुजरातचे मंत्री विजय रूपानी म्‍हणाले, ''ज्‍या कुटुंबाचे वार्षिक उत्‍पन्‍न 6 लाखांच्‍या आत आहे ते आरक्षणाच्‍या कक्षेत येणार आहे.''
> गुजरात दिनाच्‍या पार्श्‍वभूमीवर 1 मे रोजी याबाबत अधिसूचना काढली जाणार आहे.
> भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री आनंदी बेन पटेल यांच्‍या उपस्‍थ‍ितीत हा भाजपच्‍या कार्यालयात हा निर्णय घेण्‍यात आला.
> एससी, एसटी आणि ओबीसीसाठी जे 49 टक्के आरक्षण आहे त्याला हात न लावता नवीन कोट्याची तरतूद केली जाईल.
> पाटीदार, ब्राह्यण, क्षत्रिय आणि लोहाना या सर्व समाजांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

पुढील स्‍लाइडवर वाचा, पटेल आंदोलनाचा परिणाम.... हरियाणामध्‍ये काय...