आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarat Vibrant Summit In Mahatma Mandir At Gandhinagar

PHOTOS: नरेंद्र मोदींचा 150 कोटींचा ताजमहाल, बघाल तर व्हाल हैराण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- गुजरातची राजधानी गांधीनगर येथील "महात्मा मंदिर"मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हायब्रंट ग्लोबल अॅग्रीकल्चर एक्झिबिशनचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल 15 हजार चौरस मीटर सभागृहात हे एक्झिबिशन आयोजित करण्यात आले आहे.

यात देश-विदेशातील वेगवेगळ्या कंपन्यांची 250 पेक्षा जास्त दालने आहेत. यात कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक पद्धतींवर भर देण्यात आला आहे. याची भव्यदिव्यता डोळ्यांत भरणारी आहे. गुजरातच्या 50 व्या स्थापना दिनानिमित्त मे 2010 मध्ये राज्य सरकारने महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ "महात्मा मंदिर" उभारण्याची संकल्पना केली होती. गांधीनगर येथील सेक्टर-13 मध्ये तब्बल 34 एकरांवर याची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

महात्मा मंदिराची भव्याता बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...