आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या कारपासून बनवली आत्याधुनिक बाइक, मॉडिफाय करून दिला असा लुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- शहरातील नानपूरा येथील रहिवासी तरूणाने जूनी मारूती सुझुकी कार विकत घेऊन तिला मोटारसायकल बनवले आहे. या बाईकला गोवा येथे आयोजित इंडियन बाइक वीकमध्ये बेस्ट इनोव्हेटिव बाइकचे पारितोषिक मिळाले. रूजबे गावमास्टर नावाच्या या तरूणाने मारूती-800च्या इंजिनचा वापर करून ही बाईक बनवली आहे. यात चैनच्या जागी प्रोपेलेंट शाफ्टचा वापर करण्यात आला आहे. ऑल वे ड्राइव असेलेली ही शहरातील पहिली बाइक असल्याचा दावा त्याने केला आहे.


ऑटो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी...
ऑटो इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या सेमिस्टरमध्ये शिकणाऱ्या रूजबे यांने ही बाइक जवळपास दोन वर्षात बनवली. ती बनवण्यासाठी त्याला अंदाजे 1 लाख 13 हजार रुपये एवढा खर्च आला. विशेष म्हणजे 800 सीसीच्या या बाइकचा वेग 650 किमी प्रति तास आहे.  या बाइकमध्ये चार फ्रंट आणि एक बॅक गेअर आहे.


वडिलांच्या मित्राकडून विकत घेतली होती कार....
रुजबेने सांगितले की, शिक्षणासोबत नविन वस्तू बनवण्याचा त्याला छंद आहे. वडिलांच्या एका मित्राकडे जूनी मारूती कार होती. मी ती विकत घेतली आणि तिचे रूपांतर एका बाइकमध्ये केले. या बाइकची डिझाइन आणि वेल्डींगसह अधिक काम हे घरीच करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्याने आणखी एक बाइक बनवली आहे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्या बाइकची नोंद करण्यात आली आहे. 


पुढील स्लाइडवर पाबा बाइकचे फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...