आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पितचे हृदय छातीऐवजी पोटात! गुजरातचा अर्पित वैद्यकशास्त्रासाठी रहस्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाल वर्तुळात अर्पितचे हृदय - Divya Marathi
लाल वर्तुळात अर्पितचे हृदय
अहमदाबाद - हृदयाची धडधड ऐकू येते, जाणवतेही. पण अहमदाबादपासून ४० किमी अंतरावरील छापरा येथील अर्पितच्या हृदयाची धडधड चक्क दिसते. त्याचे वय १८ वर्षे.
अर्पितचे हृदय छातीत नाही, तर पोटाजवळ आहे. देशातील ही पहिलीच व आश्चर्यकारक घटना आहे. कारण असे मूल जन्मताच त्याचे निधन होते. पण अर्पित ठणठणीत आहे.
नडियादमधील धर्मसिंह देसाई हार्ट इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. संजीथ पीटर यांनी नुकतीच अर्पितची तपासणी केली. त्यांच्यानुसार, पेंटॉलॉजी केंचेल सिंड्रोममध्ये असे होते. त्यात छाती आणि पोटादरम्यानचा भाग पूर्णपणे विकसित होत नाही. हृदय छातीबाहेर धडधडत असणारी अर्पित ही देशातील एकमेव व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. जगात अशा १५६ केसेस आहेत. फक्त ५० मुलेच १२ वर्षांपर्यंत जगू शकली.

पुढे वाचा.. सर्कस चालकांची सोबत नेण्याची तयारी