आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarati Businessman Bid 1 Crore Rupees For Narendra Modi Suit

मोदी यांचे नाव विणलेल्या सूटवर सव्वा कोटीची बोली, रक्कम गंगा स्वच्छतेवर होणार खर्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत- नरेंद्र मोदींच्या सूटचा लिलाव बुधवारी सुरू झाला. पहिल्या दिवशी राजेश जुनेजा या व्यावसायिकाने १.२१ कोटी रुपयांची बोली लावली. या कोटवर सोन्याच्या तारांनी "नरेंद्र दामोदरदास मोदी' असे नाव विणलेले आहे. मोदींनी तो २५ जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत चाय पे चर्चा कार्यक्रमात घातला होता. मोदींना भेट मिळालेल्या ४५५ वस्तूही लिलावात ठेवलेल्या आहेत. त्यातून मिळणारी रक्कम गंगेच्या स्वच्छतेवर खर्च केली जाईल.

ज्याने भेट दिला : मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणात दिला होता..
मी २६ जानेवारीच्या माझ्या मुलाच्या लग्नात घालून येण्यासाठी मोदींना सूट भेट दिला. ते आले नाहीत, सूट मात्र घातला. - रमेश भिकाभाई विराणी, व्यावसायिक.
ज्याने बोली लावली : सूट व मोदींच्या पुतळ्याशी गुजगोष्टी...
२००६ मध्ये सुरतेतील महापुरादम्यान मोदींनी विद्याभारती शाळेत थांबून २२-२२ तास काम केले. त्याने मी प्रभावित झालो. मी हा सूट घालणार नाही, तो पुतळ्यासकट ऑफिसमध्ये ठेवून त्यांच्याशी गप्पा करीन. त्यामुळे मला प्रेरणा मिळेल. - राजेश जुनेजा, कपड्यांचे व्यावसायिक.

अन् ज्यांनी विरोध केला : सूट अशुभ, म्हणूनच लिलावात
सूटमुळे दिल्लीची निवडणूक हरले. मोदी त्याला अपशकुनी मानतात. यामुळे त्याचा लिलाव करत आहेत.- राशीद अल्वी, काँग्रेस प्रवक्ते.