आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarati Businessman Making Movie On Pakistani Activist Malala

मलालाच्या जीवनावर आधारित सिनेमा बनवतोय गुजरातमधील एक व्यापारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: मलाला आणि तिचे वडील जियाउद्दीन)
अहमदाबाद- पाकिस्तानातील खैबर पख्तुनवाला या वायव्य प्रांतात महिलांच्या शिक्षणासाठी तालिबान्यांविरोधात लढा देणारी मलाला युसूफजाई हिच्या जीवनावर आधारित सिनेमा येतोय. 'गुल मकई' असे सिनेमाचे टायटल आहे. 'गुल मकाई' या टोपणनावाने मलाला ही ब्लॉग लिहित होती. त्यामुळे हेच नाव या सिनेमाला देण्यात आले आहे.

गुजरातमधील रियल इस्टेटमधील व्यापारी विजय जाजू हे 'गुल मकई' सिनेमाचे निर्माता आहे. विशेष म्हणजे सिनेमातून मिळणारा नफा हा मलाला रिलिफ फंडासाठी देणार असल्याचे जाजू यांनी जाहीर केले आहे. सिनेमाचे निम्मे काम झाले असून नोव्हेंबरमध्ये उत्तर भारतात आणि गुजरातमध्ये या सिनेमाचे शूटिंग होणार आहे. एप्रिल 2015 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
'गुल मकाई'मध्ये बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते पाकिस्तानातील माजी लष्करप्रमुख जनरल अशफाक ओम पुरी जनरल कयानी ही भूमिका साकारणार आहेत. मलालाच्या आईच्या भूमिकेसाठी दिव्या दत्ता तर वडिलांची भूमिकेसाठी अतुल कुलकर्णी दिसणार आहेत. याशिवाय खलनायकाच्या भूमिकेत मुकेश ऋषी दिसणार आहेत. मलालाची भूमिका बंगाली अभिनेत्री साकारणार आहे. मात्र अभिनेत्री नाव समजू शकले नाही.

अहमद खान हे या सिनेमाच दिग्दर्शन करत आहेत. 'गुल मकई' चित्रपटात तालिबानकडून निर्माण केली जाणारी दहशत दाखविण्यात येणार आहे. त्यामुळे तालिबानी अधिकार्‍यांची खरी नावे वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी परराष्ट्र सेवेतील अधिकारी, सरकारी अधिकारी यांचीही खरी नावे वापरली असल्याचे अमजद खान यांनी म्हटले आहे.

'गुल मकई' हा विजय जाजू यांच्या रियल इस्टेट कंपनीचा पहिला प्रोजेक्ट आहे.