आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाक नसलेल्या अनाथ मुलीला US च्या पॉप सिंगरने घेतले दत्तक, ३ दाम्पत्यांनी नाकारले होते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुजः ज्याचे कोणीच नसते, त्याचा देव असतो ही म्हण काही वेळी तंतोतंत जूळून येते. आता पाहा ना, भुजच्या महिला कल्याण केंद्रात वाढत असलेली दुर्गा हिच्याबद्दल ही म्हण यथायोग्य ठरली. दुर्गाला 5 वर्षांपूर्वी अंजार भागात झुडूपांमध्ये टाकून गेले होते, रात्रभर झुडपांमध्ये पडून राहिल्याने किडे-मुंग्यांनी दुर्गाची नाक खाल्ले. नाक नसल्याने दुर्गा विचित्र दिसायला लागली. दुर्गाला अमेरिकेचा पॉप सिंगर क्रिस्टिन ग्रेई विल्यमने दत्तक घेतले आहे. क्रिस्टींन सिंगल आहे. विशेष म्हणजे दुर्गाला यापूर्वी 3 गुजराती दाम्पत्यांनी दत्तक घेण्यास नकार दिला होता.

भुजच्या महिला कल्याण केंद्रात केवळ 6 बालक आहेत आणि यांना दत्तक घेण्यासाठी 25 दाम्पत्यांनी रांग लावली आहे. मात्र दुःखाची गोष्ट म्हणजे दुर्गाला कोणतेही दाम्पत्य दत्तक घेण्यास तयार नव्हते.

प्रतिक्षा यादीनुसार क्रमांक आल्यानंतर 3 दाम्पत्यांनी दुर्गाला दत्तक घेण्यास नकार दिला. मात्र असे म्हणतात ना, देवाच्या घरी उशीर आहे मात्र अंधार नाही. सरकारी नियमानुसार जर कोणत्या बालकाला तीन वेळा नापसंद केले तर त्या बालकाला NEED म्हणून यादीत ठेवले जाते. अशा मुलांना परदेशी नागरीकही दत्तक घेऊ शकतात. क्रिस्टीन ग्रेड विल्यम अमेरिकेचे सीनसीनाटी-ओहीयोमध्ये राहातात, 40 वर्षीय क्रिस्टीन दुर्गाचे पालकत्व स्वीकारण्यास तयार आहे. 31 तारखेला दत्तक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दुर्गा नेहमीसाठी विदेशात तिच्या भावी पालकांसोबत दिसेल.

पुढील स्लाईडवर पाहा, दुर्गाचे भावी माता-पित्यासोबतचे फोटो...