आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gujarati Photographer Pics Of Pt. Jawahar Lal Nehru

B\'day Spl: गुजराती फोटोग्राफरच्‍या कॅमे-यात टिपलेली पंडित नेहरूंची दुर्मिळ छायाचित्रे...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा (गुजरात)- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा आज देशभर जन्‍मदिवस साजरा केला जातो. नेहरू असे युग पुरुष म्‍हणून ओळखले जातात ज्यांनी अवघ्या विश्वाला नवीन चेतना, नवीन दिशा आणि नवीन संकल्पना दिली. अवघ्या विश्वाला प्रभावित करणारे भारताचे पहिले पतंप्रधान म्‍हणून त्‍यांचा जगभर सन्‍मान केला जातो. त्यांनी तब्बल सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्षपद (लाहोर 1929, लखनौ 1936, फैजपूर 1937, दिल्ली 1951, हैदराबाद 1953 आणि कल्याणी 1954) भूषविले आहे.

भारताच्या स्वातंत्र्य समराच्या वेळी देशातील पहिली फोटोजर्नलिस्ट महिला होमाई व्यारावाला यांनी नेहरू यांची काही दुर्लभ छायाचित्रे घेतली होती. मुळची गुजराती असलेल्या व्यारावाला यांचे 15 जानेवारी 2012 रोजी बडोद्यात निधन झाले. परंतु, त्यांनी काढलेली छायाचित्रे आजही अजरामर झाली आहेत. त्यांनी ब्रिटिश हाऊस कमिशनरसोबत धूम्रपान करतानाचा नेहरू यांचा फोटो काढला होता.

नेहरूची दुर्लभ आणि दुर्मिळ छायाचित्रे पाहाण्‍यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...