(या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन महिलेने आत्महत्या केली.)
सुरत (गुजरात)- उधना भागातील शुभ रेसिडेंसी येथे राहत असलेल्या एक महिलेने पोटच्या दोन पोरांचा जीव घेऊन इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. पोरांचा जीव घेणारी ही महिला मानसिकरुग्ण होती, असे समोर आले आहे. रागात तिचे स्वतःवरचे नियंत्रण सुटत असे, असे तिचा पती आणि शेजाऱ्यांनी सांगितले आहे.
महेसाणा येथील रहिवासी संदिप कांतिभाई पटेल यांचे शुभ रेसिडेंसीमध्ये चौथ्या मजल्यावर घर आहे. पत्नी भावना, मुलगी धुपा (10 वर्षे) आणि मुलगा ओम (5 वर्षे) यांच्यासोबत ते राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास भावनाने पोटच्या पोरांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतरही तिला संशय होता, की मुले जिवंत आहेत. तिने त्यांच्या मानेवर चाकू आणि काटेरी चमच्यांनी अनेक वार केले. त्यानंतर भावना दहाव्या मजल्यावर गेली. तेथून उडी मारुन तिने आत्महत्या केली. पोलिस आणखी तपास करीत आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, या खळबळजनक घटनेचे फोटो...