आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'मदर्स-डे\'ला मुलीने आईला गिफ्ट दिले तिकिट, लागली 25 कोटींची लॉटरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: भूमीसोबत आई प्रीती शहा)

अहमदाबाद- मुलीने 'मदर्स डे'ला (10 मे) आपल्या आईला दिलेले गिफ्ट तिच्यासाठी 'लकी' ठरले आहे. मुलीच्या अनोख्या गिफ्टने तिची आई एका दिवसांत करोडपती बनली आहे. अमेरिकेतील नेबरास्का येथील रहिवासी प्रीती शहा यांना 25 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. प्रीती शहा यांना कन्या भूमीने 'मदर्स डे'ला हे लॉटरीचे तिकिट गिफ्ट दिले होते. बुधवारी (20 मे) लॉटरीची सोडत जाहीर झाली. प्रीती शहा यांच्या तिकिटाला 25 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
20 वर्षांत मिळतील 1.27 कोटी रुपये...
दरम्यान, प्रीती शहा यांना 25 कोटींची रक्कम टप्प्या टप्प्याने मिळणार आहे. 20 वर्षांत प्रत्येक वर्षी 1.27 कोटी रुपये प्रीती शहा यांना मिळतील.

भूमीलाही मिळतील 40 हजार डॉलर्स...
प्रीती शहा यांना 25 कोटींची लॉटरी लागली आहे. याशिवाय भूमी शहा हिला देखील लॉटरी स्टोअरतर्फे (40 हजार डॉलर्स जवळपास 25 लाख 42 हजार रुपये) बक्षिसी मिळणार आहेत. लॉटरी तिकिट स्टोअरतर्फे ग्राहकांसाठी एक ऑफर देण्यात आली होती. ती म्हणजे, स्टोअरमधून खरेदी करण्‍यात आलेल्या तिकिटाला प्रथम बक्षिस मिळाल्यास संबंधित ग्राहकाला स्टोअरतर्फे 40 हजार डॉलर्सचे बक्षिस दिले जाईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...