आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूरतमध्ये 17 मजली कापड मार्केटला भीषण आग, अग्निशमन दलाचे 24 बंब दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत - शहराच्या पुणा कुंभारिया रस्त्यावरील ऑर्चिड कॉम्प्लेक्स या 17 मजली कापड मार्केटमध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास आग लागली. सकाळी तिस-या मजल्यावर लागलेली आग हळूहळू वर पसरत 17 व्या मजल्यापर्यंत पोहोचली. अग्निशमन विभागाचे 24 बंब ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळावर उपस्थित आहेत. आगीच्या कारणांबद्दल मात्र अध्याप काही माहिती मिळालेली नाही.
अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. दरम्यान या घटनेतील जीवित हानी किंवा नुकसानीबाबतही माहिती मिळालेली नाही. मात्र, चौथा व पाचवा मजला जळून पूर्णपणे खाक झाला आहे. याठिकाणी कापड गोडाऊन असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आगीचा व्हिडीओ पाहा पुढील स्लाईडवर...
आगीचे आणखी काही फोटोज पुढील स्लाईड्वर...