आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद - बीजेपीने गुजरातमधील प्रचारासाठी एक व्हिडिओ रिलीज केला आहे. त्यात पप्पू शब्दाच्या जागी युवराज शब्दाचा वापर करण्यात आला आहे. पप्पू शब्द वापरण्यास इलेक्शन कमिशनने मनाई केली होती. न्यूज एजन्सीच्या मते, भाजप पप्पू शब्दाद्वारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवर टीका करत असते. भाजपने इलेक्ट्रॉनिक अॅडव्हरटाइजमध्ये आधीच पप्पू शब्दाचा वापर केला होता. गुजरातमध्ये पुढल्या महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यासाठी भाजप आणि काँग्रेसच्या प्रचाराचा वेग वाढला आहे.
गुजरात बीजेपीच्या फेसबूक पेजवर व्हिडिओ...
- गुजरात बीजेपीने बुधवारी त्यांच्या फेसबूक पेजवर नवी जाहिरात जारी केली. त्या जाहिरातीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली. यात रागुल गांधींसाठी युवराज शब्दाचा वापर केला आहे.
- याबाबत इस गुजरात बीजेपीचे प्रवक्ते हर्षल पटेल यांना विचारले तेव्हा ते म्हणाले, मला याबाबत माहिती नाही. हीच जाहिरात आधी निवडणूक आयोगाने थांबवली होती का हे माहिती नाही.
- भाजप नेते राहुल गांधींसाठी पप्पू, युवराज आणि शहजादा अशा शब्दांचा वापर करतात.
व्हि़डिओमध्ये काय..
- नवा व्हिडिओ 49 सेकंदांचा आहे. त्यात एक शॉपिंग स्टोर दाखवण्यात आले आहे. तेवढ्यात एक आवाज येतो - सर, सर. त्यानंतर दुकानातील मालकाच्या असिस्टंटचा आवाज योतो, तो म्हणतो युवराज आ रहे है. व्हिडिओमध्ये युवराज दाखवण्यात आलेले नाही. पण असिस्टंटला उत्तर देत मालक म्हणतो की, तो राहुल गांधींना सामान देईल पण वोट देणार नाही. कारण कांग्रेसच्या कार्यकाळादरम्यान दंगली झाल्या आणि त्यात त्यांची दुकाने जळाली होती.
- दुकानात मालकाची पत्नीही दिसते, ती म्हणते आम्ही फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीच मतदान करू.
कांग्रेस आणि भाजपमध्ये स्पर्धा
- सोशल मीडियावर काँग्रेस आणि भाजप यांच्यात जाहिरातींद्वारे एकमेकांची खिल्ली उडवण्याची स्पर्धा लागली आहे. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्याचे निकाल हिमाचल प्रदेशच्या निकालाबरोबर 18 डिसेंबरला लागतील.
- निवडणूक आयोगाने आधीच बीजेपीच्या इलेक्ट्रॉनिक अॅडव्हर्टाइजमेंमध्ये पप्पू शब्दाला मनाई करत त्याला अपमानजनक (derogatory) ठरवले होते. बीजेपीने याबाबत म्हटले कोते की, बाजेपी या जाहिरातीत या शब्दाचा वापर एखाद्या खास व्यक्तीसाठी करत नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.