आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बादशहाचा मुलगा बादशाह, हे औरंगजेबाचे राज्य त्यांनाच लखलाभ, राहुल गांधींवर मोदींची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी धरमपूरमध्ये राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्ष बनवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्हं उपस्थित केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत त्यांनी महटले की, बादशहाचा मुलगाच बादशहा बनतो. पण असे असेल तर हे औरंगजेबाचे राज्य त्यांनाच लखलाभ असो असे मोदी म्हणाले. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला दोन टप्प्यांत मतदान होत आहे. निकाल 18 डिसेंबरला लागेल. 


'राहुल जामीनावर आहेत'
मोदींनी वलसाडजवळील धरमपूर येथे झालेल्या रॅलीमध्ये म्हटले की, राहुल गांधी सध्या जामीनावर आहेत. तरीही त्यांना अद्यक्ष बनवत आहेत. आज मणिशंकर अय्यर म्हणाले की, मोगल काळात निवडणुका झाल्या होत्या का? त्यावेळी जहांगीरच्या जागी शहाँजहाँ आला होता. शाहजहांनंतर औरंगजेबच राज्य करणार हे स्पष्ट होते. जो बादशाह असेल त्याच्या मुलालाच सत्ता मिळणार हे स्पष्ट होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती आहे त्यांचा बादशाह कोण आहे ते. हे औरंगजेबाचे राज्य त्यांनाच मिळू द्या. आमच्यासाठी देश मोठा आहे. आमचे हायकमांड तर 125 कोटी जनता आहे. 


काँग्रेस म्हणजे फक्त गांधी कुटुंब.. 
- मोदी म्हणाले, भाजप मुस्लीमविरोधी असल्याचे समाजात पसरवले जातक आहे. या घराणेशाही जपलेल्या पक्षाचा मुख्य अजेंडा हाच आहे की, आमच्या विरोधात खोटे बोलायचे. पण आता गुजरातची जनता हुशार आहे, ते अफवांवर विश्वास टेवत नाही. लुटारुंना गुजरात सहन करणार नाही. 
- आधी काँग्रेसने सेक्युलरिझमचा मार्ग अवलंबला.आता या निवडणुकीत ते कुठे चालले आहेत, हे आपण सर्व पाहत आहोत. मुस्लिमांनाही त्यांच्याबाबत सर्व माहिती आहे. 


कांग्रेसने गुजरातकडे कायम दुर्लक्ष केले 
इंदिरा गांधींनी मोरारजी देसाईंना तुरुंगात टाकले होते. काँग्रेसला कधी गुजरातचे नेते सहनच झाले नाही. त्यांनी नेहमी गुजरातकडे दुर्लक्ष केले. गुजरातला बदनाम करायचे एवढेच यांचे काम आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...