आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमधील गुलबर्ग सोसायटी जळीतकांडातील दोषींना आज सुनावणार शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- 14 वर्षांपूर्वी देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या गुलबर्ग जळीतकांड प्रकरणात विशेष कोर्टने गेल्या आठवड्यात 24 जणांना दोषी ठरवले. अन्य 36 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. विशेष कोर्ट आज 24 दोषींना शिक्षा सुनावण्‍याची ‍शक्यता आहे. मात्र, गुलबर्ग सोसायटीतील एकमेव बचावलेल्या कासम अल्लानूर मंसूरीने सर्व दोषींची सूटका करा, असे म्हटले आहे.

28 फेब्रुवारी 2002 रोजी हे जळीतकांड घडले. सोसायटीत 8 ते 10 हजार लोकांचा जमाव आला होता. त्यापैकी केवळ 24 जणच कसे दोषी असणार? त्यांनाही सर्वांना सोडून द्या. त्यांना शिक्षा देऊन काही फायदा होणार नसल्याचे कासम अल्लानूर मंसूरीने म्हटले आहे.

दरम्यान, गोध्रा हत्याकांडानंतर गुलबर्ग सोसायटीत घडवण्यात आलेल्या जळीतकांडात खासदार अहसान जाफरीयांच्यासह 69 जणांची हत्या करण्‍यात आली होती.

पुढील स्लाइडवर वाचा...24 दोषी, 36 जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
बातम्या आणखी आहेत...