आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Halloween Day In Ahemadabad News In Divya Marathi

PIX - भुतांनी वाढले जेवण, तर हॉटेल झाले कब्रस्तान; अहमदाबादमध्ये भितीचा थयथयाट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादः जगभरात 31 ऑक्टोबर हा 'हेलोविन डे' म्हणून साजरा करण्यात आला. काही पाश्चिमात्य देशांमध्ये असे मानतात की, पुर्वजांच्या आत्मा खुश ठेवणे गरजेचे आहे. अहमदाबादमध्येही काही रेस्टॉरंट आणि फुड चेन्समध्ये हॅलोविन डे चे सेलिब्रेशन पाहायला मिळाले. अमहदाबाज - गांधीनगर हायवेवर कोबा सर्कलवर असलेल्या शामियाना हॉटेलमध्ये या दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी भुताटकीचे डेकोरेशन करण्यात आले. यासाठी हॉटेलमध्ये मुख्य दरवाज्याला काळ्या रंगाच्या भितीदायक पडद्याने झाकण्यात आले होते. रेस्टॉरंटच्या आसपास असलेल्या झाडांवर भूतासारखे दिसणार्‍या भयावह बाहूल्यांना लटकावण्यात आले होते. रेस्टॉरंटच्या बाहेर एक ग्रेवयार्डही बनवण्यात आले होते. एवढेच नव्हेतर या दिवसाला अधिक भितीदायक बनवण्यासाठी हॉटेलमध्ये हॉरर म्यूझिल लावण्यात आले होते, तसेच भूताचे ड्रेस घालून वेटर्सने लोकांना जेवणही वाढले.

पुढील स्लाईडवर पाहा, या भूतांचे इतर फोटो...