आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Handicapped Student Give Board Exam With Oxygen Cylinder

इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर अपंग विद्यार्थ्‍याने ऑक्‍सीजनच्‍या साह्याने दिली बारावीची परीक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
' जिनके हौसले बुलंद होते है, वह चॉंद को भी जमीपर लाते है' अशा प्रकाची जिद्द घेऊन काही लोक जन्‍माला येतात. ध्‍येयाचा ध्‍यास लागला म्‍हणजे कोणत्‍याही संकटाचा सामना करता येतो. अशा प्रकारची जिद्द असेलला रायमल डांगर नावाचा अपंग विद्यार्थी. जन्‍मजात वाट्याला आलेले अपगंत्‍व. 85 टक्के अपंग असलेला रायमल हा मुलगा सध्‍या कृत्रीम श्वाच्‍छोश्वासावर दिवस काढत आहे. फुफ्फुसाचा आजार झाल्‍यामुळे सर्वसामान्‍य व्‍यक्तिसाराखा श्‍वास घेणे त्‍याला जमत नाही. मात्र बारावीचे वर्षे वाया जाणार नाही याची खबरदारी रायमलने घेतली आहे. ऑक्‍सीजन सिलिंडरसह परीक्षा केद्रावर जाणा-या रायमलला पाहून प्रत्‍येकाला आश्चर्य वाटते.
काय आहेत रायमलचे विचार
शिक्षण घेऊन मोठं व्‍हायचं आणि समाजसेवा करायची. मी अपंग असोल तरी इच्‍छाशक्‍तीच्‍या जोरावर प्रत्‍येक संकटावर मात करणार आहे. मला अपंग असल्‍याचे दु:ख नाही. माझ्या सारख्‍या अपंग विद्यार्थ्‍यांनी जीवनात निराश न होता चांगले जगण्‍याचा प्रयत्‍न करायला हवा. यासाठी ऑक्‍सीजन सिलेंडरच्‍या मदतीने मी परिक्षा देणार आहे.
पुढील स्‍लाईडवर पहा रायमलचा संघर्ष...