आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Happiness Is But Patel Committed Suicide: Hardik Patel

सुखी असते, तर पटेलांनी आत्महत्या केलीच नसती : हार्दिक पटेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर - पटेल सुखी असते, तर त्यांनी आत्महत्या केली नसती, असे पटेल नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी सांगितले. राजकोट येथील उमेश पटेल यांची आत्महत्या व्यर्थ जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी उमेश पटेल यांनी लिहिलेल्या पत्रावरून गुजरात सरकारची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षांत ६,९०० पटेल आणि १२,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे पटेल यांनी रविवारी जमशेदपूर येथून दिल्लीला जाताना सांगितले. सरकारने या प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणीही केली. गुजरात सरकारची इच्छा असल्यास ते पटेलांना त्यांचा अधिकार देऊ शकतात. मात्र, व्होट बँकेच्या राजकारणामुळे समाजावर अन्याय होत आहे. हार्दिक पटेल यांना पुरुलिया येथे तीन राज्यांच्या कुर्मियांसाठी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचे होते. परंतु, आमंत्रणावरून उफाळलेल्या वादामुळे ते सहभागी झाले नाहीत. कुर्मी समाजातील भाजप नेत्यांनी यावर आक्षेप घेतल्याचे त्यांनी सांगितले. कुर्मी समाजात वाद व्हावा, अशी इच्छा नाही. मात्र, त्यांच्या अधिकाराच्या लढ्यात त्यांना साथ देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता देशभरात पटेल आणि समान जातीच्या लोकांसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅली आयोजित केली जाणार आहे.