आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: 404 वर्षाचे झाले महात्मा गांधीजींचे ‘राजकोट’, पाहा फोटो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रात्रीच्यावेळी असे काहीसे दिसते राजकोट शहर)
राजकोट - सौराष्ट्रची राजधानी आणि गुजरातमधील विविधतेने नटलेले शहर म्हणून ओळखले जाणारे राजकोट शहर आज 404 वा जन्मदिवस साजरा करत आहे. 7 जुलै, 1612 रोजी राजकोट शहराची स्थापना जडेजा वंशाच्या ठाकूरसाहब विभाजी जडेजा यांनी केली होती. आजी नदीच्या किनार्‍यावर वसलेले राजकोट शहराची वैशिष्टे म्हणजे येथील लोकांची दिलखुलास जगण्याची स्टाईल. एका परिवारासारखे राहणारे राजकोटी लोकांना एकतेचेही प्रतीक मानले जाते.

साधारणत: 105 किलोमिटर क्षेत्रात पसरलेले राजकोट शहर स्वातंत्र्यापूर्वी एक राज्य म्हणून ओळखले जायचे. आज या शहराने देशात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ऑटो पार्ट्स आणि ज्वेलरीसाठी राजकोट संपूर्ण देशात प्रख्यात आहे. आपली संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरा जपत राजकोट आज आधुनिक, विकसित आणि समृद्ध शहर म्हणून ओळखले जात आहे.

ब्रिटिशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे वडील राजकोट शहराचे दीवान होते. स्वत: गांधीजींचे बालपण राजकोटमधील गल्लीबोळांमध्ये गेले आहे. तसेच त्यांचे शिक्षण अलफ्रंट हायस्कूलमध्ये झाले. महात्मा गांधीजींची अहिंसा रॅली आणि सत्याग्रहाची मुहूर्तमेढ येथूनच रोवली गेली. या विशेषदिनी आम्ही सादर करत आहोत राजकोट शहराचे काही खास फोटोज...
पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, राजकोट शहराबद्दल....