अहमदाबाद - गुजरातमध्ये स्टीलच्या भांड्यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. घराघरांत उपयोगात येणार्या छोट्या चमचापासून ते मोठमोठय़ा स्टीलच्या वस्तू (भांडी) आता भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचे माध्यम बनणार आहेत. अहमदाबादच्या स्टील र्मचंट असोसिएशनने 100 ते 150 प्रकारच्या भांड्यांवर मोदींचे स्टिकर लावून ‘हर हर मोदी..घर घर मोदी’चा नारा घरोघरी पोहोचवण्याचा चंग बांधला आहे. भाजपचे आमदार व उद्योग सेलचे संयोजक जगदीश पंचाल यांनी असोसिएशनच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती दिली. मुंबई, जोधपूरसह देशभरात अहमदाबादेतून दर महिन्याला 20 ते 30 लाखांची भांडी विक्रीसाठी जातात.
मोदी पंतप्रधानपदासाठी सर्मथन म्हणून या व्यावसायिकांनी मोदी ब्रँडची छबी उत्पादनावर लावण्याचा निर्णय घेतला. भांड्याला भांडे लागल्यानंतर आवाज होतो, असे म्हणतात. त्यामुळे गुजराती भांडी उत्पादकांच्या या कृतीवर राजकीय वतरुळात ‘आदळआपट’ होण्याची चिन्हे आहेत.