आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेलला अटक, देशद्रोहाचा गुन्हा दाखल - तिरंग्याचा अवमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत/ राजकोट - गुजरातमधील पटेल आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलला राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून पोलिसांची हत्या करण्यास युवकांना प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
राजकोटमधील भारत- दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा क्रिकेट सामना उधळण्याची धमकी दिल्यामुळे राजकोट पोलिसांनी रविवारी हार्दिकला स्थानबद्ध केले होते.
आता त्याला राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. ३ ऑक्टोबर रोजी हार्दिकने आत्महत्या करू नका, पोलिसांना ठार मारा, अशी चिथावणी दिली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम १२४ (अ) अन्वये देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक गंगादीप गंभीर यांनी सांगितले.