आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hardik Patel Missing, Quota Row Hardik Holds Meeting Evades Detention By Police

पोलिसांना पाहाताच हार्दिक पटेलने काढला पळ, अटकेसाठी पोलिसांची नाकाबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये आंदोलन करत असलेले पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपासून बेपत्ता आहेत. हार्दिकच्या वकिलांनी रात्री उशिरा हार्दिक बेपत्ता असल्याची, पोलिसांनी त्यांना बंधक बनवले असल्याची आणि त्यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती दिली. वकिलांनी गुजरात हायकोर्टाचे न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या निवासस्थानी बंदी प्रत्यक्षीकरण याचिका सादर केली.

याचिकेत म्हटले आहे की, पोलिसांकडे विचारणा केली असता, ‘माहीत नाही’ एवढेच उत्तर मिळते. त्यामुळे हार्दिकला तत्काळ हायकोर्टासमोर उपस्थित करावे. न्यायमूर्ती शाह यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती.

पोलिसांना पाहाताच हार्दिकने काढला पळ
हार्दिक पटेलने मंगळवारी संध्याकाळी पोलिसांना पाहाताच पळ काढला. अरवली जिल्ह्यातील एका गावात विना परवानगी एका जनसभेचे आयोजन केल्याविरुद्ध पोलिस हार्दिक पटेलला अटक करण्याच्या प्रयत्नात होते.

एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की,हार्दिक अरवली जिल्ह्यातील तेनपूर गावात एका सभेत संबोधित करण्‍यासाठी पोहोचला होता. पो‍लिस देखील त्याला अटक करण्‍यासाठी पोहोचले होते. परंतु, हार्दिकने पोलिसांना पाहाताच तेथून पळ काढला.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, गांधीनगर व साबरकांठ्यात पोलिसांची नाकाबंदी...