आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामिनासाठी हार्दिक पटेल राज्याबाहेर राहण्यास तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- राष्ट्रदोहाच्या आरोपाखाली तुरुंगवासात असलेला हार्दिक पटेल जामिनाच्या बदल्यात गुजरातच्या बाहेरही राहण्यास तयार आहे. याप्रकरणी सोमवारी गुजरात उच्च न्यायालयात त्याच्या वकिलाने प्रतिज्ञापत्र दाखल केले. जामिनाच्या बदल्यात न्यायालयाने सहा महिने गुजरातच्या बाहेर राहण्याची अट घातली तरी मान्य आहे, असे हार्दिकच्या वकिलाने यात म्हटले. मात्र, त्याला एका दिवसासाठी जरी सोडले तरी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसमोर संकट निर्माण होईल, असे गुजरात सरकारने म्हटले आहे.

या उत्तरावर न्यायालयाने सरकारला मात्र तीव्र शब्दांत फटकारले आहे. कायदा सुव्यवस्था कायम ठेवणे हे सरकारचे कामच असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तत्पूर्वी सरकारच्या वकिलाने आंदोलन, त्याची पार्श्वभूमी आणि हिंसाचाराचा उल्लेख करत हार्दिकला जामीन देण्याचे आवाहन केले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू जाणून घेत निर्णय राखून ठेवला आहे. हार्दिक पटेल ऑक्टोबर २०१५ पासून न्यायालयीन कोठडीत आहे.