आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हार्दिक म्हणाला, आरक्षणाबाबत काँग्रेसने म्हणणे ऐकले, सत्ता आल्यास मंजूर करणार विधेयक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - पाटीदार आरक्षण आंदोलन समिती (PASS) चा नेता हार्दिक पटेलने पाटीदार समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर बुधवारी पत्रकतार परिषद घेतली. यावेळी हार्दिक म्हणाला की, आरक्षणाबाबत काँग्रेसने आमचे म्हणणे ऐकले आहे. त्यामुळे आम्हाला काँग्रेसचा फॉर्म्युला मंजूर आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आरक्षणाचा प्रस्ताव पास करणार आहे. गुजरातमध्ये कधीही 50% पेक्षा जास्त आरक्षण घेतलेले नाही. घटनेतही कुठे असे लिहिलेले नाही की, 50% हून जास्त आरक्षण दिले जाऊ शकत नाही. गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला 2 टप्प्यांत मतदान होणार आहे. तर निकाल 18 डिसेंबरला लागणार आहे. 

 
 
आणखी काय म्हणाला हार्दिक .. 
- 1994 नंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये 50% पेक्षा जास्त आरक्षण देण्यात आले आहे. मला फक्त एवढे सांगायचे आहे की, जो काही सर्वे होईल तो ओबीसींना सोबत घेऊन व्हायला हवा. 
- आमची लढाई अधिकारांसाठी आहे. स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला स्वतःच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार आहे. गेल्या काही दिवसांत मीडियामध्ये वातावरण निर्मिती झाली आहे. तिकिट घेऊन पाटीदारांना वाद केला असे सांगण्यात आले. पण पाटीदारांनी काँग्रेसकडे तिकिट मागितले नाही, हे मला स्पष्ट करायचे आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...