आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटेल समुदायाच्या आहात याबद्दल साशंक; हार्दिक यांचा मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- भाजप पटेल समुदायाला व्होट बँक समजते, असा आरोप करतानाच मुख्यमंत्री पटेल समुदायाच्या आहेत, यावर विश्वास बसत नसल्याचा टोला गुजरातमधील तरूण नेता हार्दिक पटेलने लगावला आहे.

हार्दिक पटेल सध्या तुरूंगात आहे. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना पत्र पाठवून त्यात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अलीकडेच झालेल्या एका जाहीर सभेचा या पत्रातून समाचार घेण्यात आला आहे. पटेल समुदाय स्वार्थी आणि चोरी करणारा आहे, असा आरोप तुम्ही सभेतून केला होता. त्यामुळे तुम्ही या समुदायाच्या प्रतिनिधी आहात, याबद्दलच मला आता शंका वाटत आहे. तुम्ही कोणत्या आधारे हा आरोप केला ? गेल्या ३० वर्षांपासून भाजपला पाठिंबा देणारा हाच पटेल समुदाय आहे. भाजपची राज्यातील पाया बांधणी त्यामुळेच होऊ शकली, असे हार्दिकने पत्रात म्हटले आहे. हार्दिकच्या वकिलांनी गुरूवारी सदर पत्राचा मसुदा वाचून दाखवला. पटेल समुदाय भाजपची मालमत्ता नाही. आमच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यात यावा, या मागणीचा हार्दिकने पत्रातून पुनरूच्चार केला.

74 एफआयआरच्या निर्णयाचे स्वागत
पटेल आरक्षणादरम्यान झालेला हिंसाचाराच्या प्रकरणात हार्दिकच्या विरोधात ७४ एफआयआर दाखल करण्यात आले होते. ते सर्व मागे घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने घेतला होता. त्या निर्णयाचे हार्दिकने स्वागत केले.
बातम्या आणखी आहेत...