आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hawala Scam, Afroj Fatta Arrested At Gandhinagar

हवाला घोटाळेबाज अफरोज फट्टा अटकेत; ईडी अधिकार्‍यास धमकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगर- अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांना बघून घेण्याची धमकी दिल्याप्रकरणी हवाला घोटाळ्याचा मुख्य आरोपी अफरोज फट्टा याला अहमदाबाद येथे अटक करण्यात आली. हवाला प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात ईडीने त्याला तीनवेळा समन्स बजावले होते. त्यासाठी तो ईडी कार्यालयात आला होता. तपास संस्थांना तो सहकार्यदेखील करत नव्हता. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. तेव्हा त्याने संबंधित अधिकाºयाला बघून घेण्याची धमकी दिली.

फट्टा सायंकाळी पाच वाजता ईडी कार्यालयात आला. अधिकारी त्याची चौकशी करत असताना प्रश्नांची उत्तरे देण्यास अथवा सहकार्य करण्यास त्याने नकार दिला. तत्पूर्वी तपास संस्थेच्या कार्यालयाबाहेर बोलताना त्याने या प्रकरणाचा सूत्रधार मदनलाल जैन नामक व्यक्ती असल्याचा
आरोप केला.