आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिस्ता सेटलवाड यांची अटक तूर्तास टळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - निधीच्या अपहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांची अटक 4 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने तिस्ता, त्यांचे पती जावेद आनंद आणि तन्वीर यांची अटक काही दिवसांसाठी टाळली आहे. गुलबर्ग सोसायटीच्या निधीचा अपहार करण्यात आल्याचा ठपका सेटलवाड यांच्यावर आहे. शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान न्या. अनंत दवे यांनी तूर्त अटक न करण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण ? : सेटलवाडसह इतर आरोपींनी गुलबर्ग सोसायटीचा 1.51 कोटी रुपयांचा निधी लाटला. हा पैसा खासगी मौज-मस्तीवर उडवण्यात आल्याचा गुन्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने नोंदवला आहे. गुलबर्ग सोसायटीतील 11 रहिवाशांनी सेटलवाड यांच्यावर गेल्या वर्षी हा आरोप केला होता.