आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • He Left Me, But I Didn't Feel Sorry; Yoshodaben Expressed Her Feeling About Modi

त्यांनी मला सोडून दिले, त्याचे वाईट वाटत नाही; यशोदाबेन यांनी व्यक्त केल्या मोदींबद्दलच्या भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - नरेंद्र मोदी यांची पत्नी असल्याचे सांगणा-या निवृत्त शिक्षिका यशोदाबेन (62) यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत मोदींबद्दल जाहीर भाष्य केले. ‘त्यांनी मला सोडून दिले याचे आता वाईट वाटत नाही. माझ्या नशिबाचे हे भोग आहेत,’ असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या भावाच्या घरी राहणा-या यशोदाबेन यांना 14 हजार रुपये पेन्शन मिळते. बहुतांश वेळ देव-देव करण्यात जातो. अशात त्या अहमदाबादला आल्या तेव्हा एका इंग्रजी दैनिकाने त्यांना गाठले. मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यशोदाबेन यांची ही पहिलीच मुलाखत आहे. दोघांचा 45 वर्षांपूर्वी विवाह झाला होता अशा बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या तेव्हा मोदींनीही आपला विवाह झाल्याचे नाकारले नव्हते.
प्रश्न : विवाह कधी झाला, आता काय स्थिती आहे?
* मी 17 वर्षांची होते तेव्हा आमचा विवाह झाला. वैवाहिक जीवनाच्या प्रारंभीच्या काळात ते माझ्याशी खूप चर्चा करायचे. कधी कधी स्वयंपाकघरातही मदत करत. ‘तुझे वय कमी आहे. तू शिक्षण पूर्ण करायला हवे...’असे ते नेहमी सांगत.
प्रश्न : आपल्याला मोदींपासून विभक्त राहिल्याबद्दल वाईट वाटते?
सुमारे तीन वर्ष तीन महिने आम्ही सोबत राहिलो. त्यानंतर कधी आम्ही परस्परांशी बोललो नाहीत.
प्रश्न : नरेंद्र मोदींच्या बातम्या तुम्ही वाचता?
होय, मी मोदींशी संबंधित प्रत्येकी बातमी आणि लेख वाचते. टीव्हीवरही त्यांचे कार्यक्रम आवडीने पाहते. त्यांच्याबद्दल चांगले छापून आलेले मला आवडते.
प्रश्न : तुम्हाला सोडून देत असल्याबद्दल मोदी कधी बोलले होते?
* एकदा ते म्हणाले होते, ‘मी देशभर फिरत असतो. माझ्यासोबत येऊन तू काय करणार?’ मी जेव्हा वडनगर येथील मोदींच्या घरी गेले तेव्हा ते म्हणाले होते, ‘कशाला आलीस? तुझे वय खूप कमी आहे. तू शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे.’ खरे तर वेगळे होण्याचा निर्णयच मुळात माझा होता. आम्हा दोघांत कधीच भांडण किंवा वाद झाला नाही. मी जेव्हा कधी त्यांच्या घरी जायचे तेव्हा ते घरी नसायचे. संघाच्या शाखांवरच त्यांचा दिवस जायचा. म्हणून नंतर मी त्यांच्याकडे जाणे सोडले.
प्रश्न : अजूनही तुम्ही स्वत:ला मोदींच्या कायदेशीर पत्नी मानता?
* आज जेव्हा मोदींचे नाव समोर येते तेव्हा कुठे ना कुठे माझेही नाव येतेच. लोक मला विचारणा करतात. आपणही मला शोधत आलातच ना? मी त्यांची कायदेशीर पत्नी नसते तर तुम्ही आला असतात का?’
प्रश्न : तुम्ही तेव्हा दुसरा विवाह का केला नाही?
* पहिल्या विवाहाचा अनुभव पाहता दुस-या विवाहाचा विचारच मनात आला नाही.
ते बोलावणार नाहीत...
मोदी पंतप्रधान झाले व दिल्लीतून तुम्हाला बोलावणे धाडले तर काय कराल, असा प्रश्न विचारला तेव्हा यशोदाबेन म्हणाल्या, गेल्या 42 वर्षांपासून आमचा संपर्क नाही. कधी मी त्यांना भेटायलाही गेले नाही. माझ्यामुळे त्यांना त्रास होऊ नये, याची मी काळजी घेते. त्यांनी असेच यशोशिखर गाठावे, अशीच माझी इच्छा आहे. ते एक दिवस निश्चितपणे पंतप्रधान होतील... पण मला ते आता बोलावतील असे वाटत नाही...
पायरी हुकली..!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी गुजरातमध्ये सोमनाथ महादेव ज्योतिर्लिंग मंदिरात सुवर्ण कळसाचे लोकार्पण झाले. त्यानंतर दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत असताना पाय-यांवर त्यांचा अंदाज चुकला आणि ते पडता पडता वाचले. बाजूलाच उभ्या असलेल्या सुरक्षा सहायकाने त्यांना सावरले.
छाया : मिलाप अग्रावत