आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात: उपमुख्यमंत्री पुत्राला विमानातून हाकलले, नशेत तर्रर्र असल्याचा आरोप, स्टाफने रोखले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल - Divya Marathi
गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल
अहमदाबाद- गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांच्या पुत्राने काल (सोमवारी) एअरपोर्टवर राडा केल्याची माहिती समोर आली आहे. जयमीन पटेल हे नशेत तर्रर्र होते. त्यामुळे त्यांना विमानात प्रवेश दिला नसल्याचे फ्लाइट ऑफिसरने सांगितले. यावेळी जयमीन पटेल यांनी फ्लाइटच्या स्टाफसोबत हुज्जतही घातली.

दुसरीकडे, नितिन पटेल यांनी हे वृत्त फेटाळले आहे. लोक अफवा पसरवत आहे. जयमीन, पत्नी आणि मुलीसोबत ग्रीसला जाण्यासाठी निघाले होते.

जयमीन नशेत होते तर्रर्र, स्टाफने रोखले
- न्यूज एजन्सीनुसार, जयमीन पटेल, पत्नी आणि मुलगी सोमवारी सकाळी ग्रीस जाण्यासाठी एअरपोर्ट पोहोचले. तिघांचे तिकीटे आधीच बुक झाले होते. परंतु, जयमीन पटेल हे चालण्याच्याही अवस्थेत नव्हते. त्यांनी परिस्थिती पाहून स्टाफने आक्षेप घेतला.
- जयमीन नशेत इतके तर्रर्र होते की, त्यांना इमिग्रेशन काउंटर आणि इतर चौकशीसाठी अक्षरश: व्हीलचेअरवर घेऊन जावे लागले.
-अधिकार्‍यांनी सांगितले की, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या जयमीन यांना विमानात बसण्याची परवानगी नाकारण्यात आली. यावरून जयमीन यांनी एअरलाइन्सच्या कर्मचार्‍यांसोबत हुज्जतही घातली. त्यांना शिविगाळ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नितिन पटेल म्हणाले, बदनाम करण्याचे षडयंत्र...
- नितिन पटेल यांनी सोमवारी सायंकाळी गांधीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला. कुटुंबाला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचे ते म्हणाले. जयमीन, पत्नी आणि मुलगी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी ग्रीसला जाण्यासाठी निघाले होते. एअरपोर्टवर जयमीन यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यांना एअरपोर्टहून तात्काळ घरी बोलवून घेतले. जयमीन यांच्या विरोधात अफवा पसवल्या जात असल्याचे नितिन पटेल यांनी म्हटले आहे.

'नो फ्लाय लिस्ट'मध्ये उपद्रवी प्रवाशांना 3 महिने ते आजीवन विमान प्रवास बंदीचा प्रस्ताव
उपद्रवी प्रवाशांच्या विमान प्रवासावर प्रतिबंध घालण्यासंबंधीच्या प्रस्तावित नियमांचा मसुदा केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जारी केला होता. राष्ट्रीय उडाण प्रतिबंध सूचीचे (नो फ्लाय लिस्ट) हे नियम सर्व देशांतर्गत विमानसेवा कंपन्यांना लागू राहतील. त्यात तीन महिने ते आजीवन विमान प्रवासावर बंदीची तरतूद करण्‍यात आली आहे.

उपद्रवी विमान प्रवाशांच्या वर्तनाची तीन श्रेणींत विभागणी
श्रेणी- 1 : यात बेमुर्वतखोर वागून बाधा आणणारे व्यवहार असतील. उदा. अंगविक्षेप, शाब्दिक बाचाबाची इत्यादी. त्यासाठी तीन महिन्यांपर्यंत नो फ्लाय लिस्टमध्ये नाव समाविष्ट केले जाईल.

श्रेणी- 2 : यात मारहाण, धक्का देणे, पकडणे, अनुचित प्रकारे स्पर्श व लैंगिक छळ करणे किंवा प्रयत्न करणे आदींचा समावेश. यासाठी सहा महिने प्रवासबंदीचा प्रस्ताव आहे.

श्रेणी 3 : यात प्राणघातक वर्तनाचा समावेश आहे. उदा. विमानाच्या ऑपरेटिंग प्रणालीला हानी पोहोचवणे, गळा दाबणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे किंवा चालक दलाच्या कंपार्टमेंटमध्ये बळजबरी घुसण्याचा प्रयत्न करणे इत्यादी. यासाठी दोन वर्षांपासून आजीवन प्रतिबंध घालण्याचा प्रस्ताव आहे.

30 जूनपासून अंमलबजावणी
- ‘जगातील कोणत्याही देशात नो फ्लाय लिस्ट नाही. मसुद्यावर सर्व घटकांकडून ३० दिवसांत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर 30 जूनपासून हे नियम लागू केले जातील.’
- जयंत सिन्हा, नागरी उड्डाण मंत्री

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...