आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या वातावरणात मोठा बदल, मुसळधार पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गांधीनगरः गुजरातच्या वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. गुजरातमध्ये अनेक भागात अवकाळी पावसाचे आगमन झाले. गांधीनगर जिल्ह्यातील दहेथाम पंकथमध्ये आज सकाळी अर्ध्या तासापर्यंत मुसळधार पाऊस पडला. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे पिकांना नुकसान होणार यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे.

चरोतर भागात काल आलेल्या पावसाने मोठे नुकसान झाले. आणंद शहराच्या आसपासच्या परिसरात काल रात्री अचानक वातावरणात मोठा बदल झाला आणि मुसळधार पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे धान्य आणि तंबाखू यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले. पुर्वेकडील मध्य अरबी समुद्र आणि त्यासोबत जोडलेल्या उत्तर कोकण तसेच दक्षिण गुजरातच्या किनारपट्टी भागावर अप्पर एअर साइक्लोन सरक्युलेशन सिस्टमची निर्मिती झाली आहे, यामुळेच राज्याच्या दक्षिण भागात पुढील 2-3 दिवस सामान्य अथवा मध्यम स्वरुपातील पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाईडवर पाहा, या मुसळधार पावसाची इतर छायाचित्रे....