आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये मुसळधार : पूल तुटला, रूळ गेले वाहून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरेली - गुजरातच्या सौराष्ट्रात मुसळधार पावसामुळे बुधवारी अमरेलीच्या शेत्रुंजी नदीवर बांधलेला पूल वाहून गेला. अनेक ठिकाणी रूळ वाहून गेले. राजकोट-अमरेलीमध्ये १०० पेक्षा अधिक लोकांना हेलिकॉप्टरमधून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. रेल्वे आणि रस्ता मार्ग बंद झाले आहेत. अमरेलीचा बहुतांश भाग जलमय झाला आहे. येथील लिलिया, सावरकुंडला ग्रामीण भागात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. दोन हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एसआरपी व एनडीआरएफ पथकाच्या सदस्यांनी बचाव अभियान सुरू केले आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. अमरेलीच्या बगसरामध्ये २६ इंच, तर धारीमध्ये आठ तासांत २२ इंच पाऊस पडला आहे. वडियामध्ये १८, राजुलामध्ये १०, खांभा, लाठी व अमरेलीमध्ये प्रत्येकी आठ इंच पावसाची नोंद झाली.

खेडियार-वडिया खांभा रायडी, बेदुमल-३, धारतवडी- २ (राजुला) धरणाचे दोन दरवाजे एक ते दोन फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. राजकोटचे भादर धरणही ओसंडून वाहत आहे.
बातम्या आणखी आहेत...