राजकोट- संततधार पावसामुळे उत्तर आणि मध्य गुजरातमध्ये हाहाकार उडाला असताना राजकोट शहरातील लोकांनी पावसाचा मनमुराद आनंद लुटला आहे. उड्डान पुलाखाली साचलेल्या पाण्यात तरुणाईने धमाल मस्ती केली.
सौराष्ट्रमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली. पाण्यासाठी व्याकूळ झालेले नदी- नाले दुथडी भरून वाहून निघाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दमदार पाऊस होत असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेल्या 24 तासांत राजकोटमध्ये 22 इंच पावसाची नोंद झाली आहे. शहरातील महिला कॉलेजजवळील उड्डान पुलाखाली पाणी साचल्याने तरुणाई धमाल मस्ती केली. लोकांनी परिसराला जणू स्विमिंगपूल बनवून टाकला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, उड्डान पुलाखाली साचलेल्या पाण्यात धमाल मस्ती करताना राजकोटमधील लोक...