आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heavy Rains And Major Flood Situation In North Gujarat

FRESH Photos: गुजरातमध्ये रस्ते फाटले, पाणी साचले, सर्वत्र हाहाःकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालनपूर- उत्तर गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये आतापर्यंत 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनडीआरएफ आणि राज्य रिझर्व्ह पोलिस (एसआरपी) यांच्या टीम बनासकांठा येथे पाठवण्यात आला आहेत. बनासकांठा, राजकोट, कच्छ आणि पाटण जिल्ह्यात महापुराने थैमाल माजले आहे. साबरकांठा, सुरत आणि नवसारी या जिल्ह्यांमध्ये नागरिक बळी पडले आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस येत आहे. सोमवारी रात्री धुंवाधार पाऊस झाला. त्यामुळे सखल भागात पाणी साचून राहिले. अतिरिक्त जिल्हाधिकारी एनडी मिस्त्री यांनी सांगितले, की एक हजार लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले आहे. 400 गावांचा वीज पुरवठा विस्कळित झाला आहे. 1009 विजेचे खांब कोसळले आहेत. एनडीआरएफच्या माध्यमातून 30 हजार अन्नाचे पॅकेट्स पुरवले जात आहेत.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, गुजरातमधील महापूर... अशी झाली लोकांची दैना... रस्ते वाहून गेले...