आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Hi Tech And Luxurious Bus In Gujarat. Daily Rajkot Run To Ahmadabad News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमान नव्हे, ही आहे गुजरातमधील सगळ्यात महागडी Hitech Bus!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: दररोज राजकोट ते अहमदाबाद धावणारी हायटेक बस)
राजकोट- प्रत्येक सीटवर 18 इंचाचा टच स्क्रीन विथ डीटीएच कनेक्शन, रेफ्रीजरेटर, मायक्रोवेव्ह, कॉफी वेंडिंग मशीन, टॉयलेट, मनोरंजनासाठी 50 मुव्ही आणि 5000 गाणे तसेच वाय-फाय आणि अन्य लक्झरीयस सुविधा असलेले हे काही विमान नाही. ही आहे गुजरातमधील सगळ्यात महागडी हायटेक बस.

या बसमध्ये मिळणार्‍या सुविधा एखाद्या विमानापेक्षा कमी नाही. प्रवाशांच्या आरामदायक सफरीसाठी मनोरंजनापासून प्रत्येक सुविधा पुरवली जाते. विशेष म्हणजे या बसमध्ये 'एअर होस्टेस' असून त्या प्रवाशांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतात.

राजकोट येथील एका खासगी ट्रॅव्हल कंपनीची ही बस असून दररोज राजकोट ते अहमदाबाद या मार्गावर धावते. या हायटेक बसची किंमत दोन कोटी रुपये आहे. कंपनीच्या अनेक लक्झरीयस बस प्रवाशांच्या सेवेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हायटेक बसची छायाचित्रे पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्स क्लिक करा...
(सर्व छायाचित्रे... दिव्यभास्कर)