आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातचे हायटेक ग्रंथालय, एटीएममधून मिळतात पुस्तके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - वाचन संस्कृती जोपासण्याचे काम करणारी ग्रंथालये आता हायटेक होत आहेत. ज्या प्रमाणे एटीएम यंत्रात कार्ड टाकल्यानंतर पैसे मिळतात त्याच पद्धतीने येथील केंद्रीय ग्रंथालयात साडेतीन लाख रुपये खर्च करुन अत्याधुनिक पुस्तक देवघेव डेस्क बसविण्यात आला आहे. मांडवी परिसरातील हे ग्रंथालय या सुविधेमुळे राज्यातील प्रथम हायटेक ग्रंथालय झाले आहे.
ऑटो चेक आऊट आणि चेक इन मशिनमुळे वाचक आता स्वतः निवडलेले पुस्तक ग्रंथालयाच्या कर्मचार्‍यांशिवाय नोंदणी करुन घेऊ शकतात. यामुळे त्यांचा लांबच लांब रांगेत उभे राहाण्याचा वेळ वाचणार आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये ग्रंथालयात आर.एफ.आय.डी (रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टीफिकेशन डिव्हाइस), ऑटोमॅटिक बुक इश्यू डेस्क, ऑटोमॅटिक बुक रिटर्न डेस्क बसविण्यात आले आहेत.
ग्रंथालयाचे मुख्य ग्रंथपाल कौशिक शहा म्हणाले, पुस्तकांच्या देवघेवीसाठी वाचकांना आधी लांब रांगेत ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र, ऑटो चेक इन आणि चेक आउट मशिनमुळे त्यांचा वेळ वाचत आहे.
हॅन्ड हेल्ड पोर्टेबल रिडर
या मिशनद्वारे ग्रंथालयातील पुस्तकांची माहिती एका क्लिक सरशी मिळत आहे. ग्रंथालयातील कोणत्या रॅकमध्ये किती पुस्तके आहेत, याचा डेटा या मशिनद्वारे मिळणार आहे. या यंत्राची किंमत 132000 रुपये आहे.
ऑटोमॅटिक बुक रिटर्न डेस्क
वाचकाने केयोस्कवर आपल्या आवडीचे पुस्तक किंवा स्मार्ट कार्ड ठेवले, की केयोस्क एका क्लिकने पुस्तकाची देवघेव पूर्ण करते. या केयोस्कची किंमत चार लाख रुपये आहे.
फायदे
वाचक ग्रंथालयाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीशिवाय पुस्तक देवघेव पूर्ण करु शकतील.
पुस्तक देवघेव करण्यासाठी रांगेत उभे राहाण्याची गरज नाही.
वाचक आणि ग्रंथालय कर्मचार्‍यांचा वेळ वाचेल.
संपूर्ण प्रक्रिया कॉम्प्युटरराइज्ड असल्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी आहे.