आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: देशातील मोठ्या शहरांनाही मागे टाकेल असे एक हायटेक गाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबेन गावाचा फाईल फोटो. - Divya Marathi
बाबेन गावाचा फाईल फोटो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये ‘आदर्श गाव योजना’ सुरू केली. या योजनेंतर्गत प्रत्येक खासदाराला त्याच्या क्षेत्रात किमान एक गाव दत्तक घेऊन त्या गावाचा पूर्ण विकास करायचा आहे. पण सूरत जिल्ह्यात एक असे गाव आहे ज्याला या योजनेची काहीही गरज नाही. त्याचे कारण म्हणजे, येथील लोकांना विकासासाठी नेत्याची गरज नाही, त्यांनी स्वतःच गावाला एवढे विकसित केले आहे की, संपूर्ण देशासाठी ते आदर्श ठरू शकते.

आम्ही सांगतोय ते, सूरत जिल्ह्यापासून सुमारे 35 किमी अंतरावर असलेल्या बाबेन गावाबाबत. सुमारे 13 हजार लोकसंख्येच्या या गावात 2007 मध्ये सरपंच भावेशभाई यांच्या नेतृत्वात गावातील पंचायतीच्या सर्व 19 सदस्यांनी गावाच्या विकासाचा संकल्प केला होता. तेव्हापासूनच या गावाचे नशीब फळफळले असे म्हणता येईल. 2011 मध्ये गुजरात सरकारने बाबेन गांवच्या ग्राम पंचायतीला ‘बेस्ट ग्राम पंचायत ऑफ द ईअर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दृष्टीक्षेपात गाव :
- 8500 पैकी 95 टक्के पक्की घरे
- गटार, पाणी, स्ट्रीट लाइटसह सर्व प्राथमिक सुविधा
- आंगणवाडी, पंचायत घर
- कम्युनिटी हॉल, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा
- बँक, पोस्ट ऑफिससाठी वेगळ्या जागा
- स्वतंत्र रुग्णवाहिका
- पंचायतीचे एक कोटी रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट
- गावात 12 फुटांचे पक्के रस्ते
- रस्त्याच्या दोन्ही बाजुला स्ट्रीट लाइट्स
पुढील स्लाइड्सवर पाहा, बावेन गावाचे इतर काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...