आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

110 कोटी रुपये खर्च करुन विमानतळाच्‍या तोडीचे सरकारी बसस्‍थानक, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा - सरकारी बसस्‍थानक म्‍हणताच आपल्‍यासमोर येते प्रवांशांची, किरकोळ विक्रेत्‍यांची, भिका-यांची गर्दीच गर्दी. जिकडे जिकडे घाणीचे साम्राज्‍य, प्रत्‍येक भिंतीवर मारलेल्‍या पिचका-या. पण हे सर्व या घटनेला अपवाद आहे गुजरात मधील वडोदरा हे बसस्थानक. सरकारने तब्‍बल 110 कोटी रुपये खर्च करुन हे बनविले आहे. ते कुठल्‍याही पाइव्‍ह स्‍टार हॉटेलपेक्षा किंवा विमातळापेक्षा कमी दिसत नाही.

वडोदराच्‍या सयाजीगंज भागामध्‍ये या हायटेक बसस्‍थानकाचे उद्घाटन गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते झाले. सुरुवातीला या बसस्‍थानकावर वॉल्‍वो बसेसलाच परवानगी होती; पण आता सगळया बसला परवानगी देण्‍यात आली आहे. 24 तासात या ठिकाणी 1524 गाडया येतात. तर प्रत्‍येक दिवसी सरासरी 45 हजार प्रवाशी ये- जा करतात.

2.5 लाख चौरस फुट असलेल्‍या भव्‍य जागेमध्‍ये हे बसस्‍थानक उभारण्‍यात आले आहे.

विमानतळासारख्‍या सुविधा

  • दोन मजल्‍याचे वाहनतळ
  • 50 डीलक्‍स प्रतिक्षा कक्ष
  • वातानुकूलीत प्रतीक्षालय
  • लगेजसाठी ट्रॉली, व्‍हीलचेअर सारख्‍या सुविधा
  • रेल्‍वे स्‍टेशन आणि एअरपोर्ट प्रमाणे प्रवाशांसाठी सामान ठेवण्‍यासाठी स्‍पेशल ब्‍लॉक रुमची व्‍यवस्‍था


पुढील स्‍लाइडवर पाहा, विमानतळासारख्‍या असलेल्‍या बसस्‍थानकाची छायाचित्रे...