आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्या राज्यात 110 कोटींचे सरकारी बसस्टॅंड, बघा डोळे दिपवणारे फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सयाजीगंज परिसरात नवीन बांधण्यात आलेले सरकारी बसस्टॅंड.)
बडोदा (गुजरात)- सरकारी बस किंवा सरकारी बसस्टॅंडचे नाव आले तरी डोळ्यांसमोर अस्वच्छता, सर्वत्र पसरलेला कचरा, घाणेरडे वातावरण, भींतींवर पानांच्या पिचकाऱ्या अशा स्वरुपाचे दृष्य येते. परंतु, गुजरातच्या बडोदा येथील सरकारी बसस्टॅंड बघितल्यावर तुमच्या मनातील या कल्पनेला जरा छेद बसेल. हे बसस्टॅंड आहे की पंचतारांकीत हॉटेल असा प्रश्न तुम्हाला पडेल.
बडोद्यातील सयाजीगंज परिसरात असलेल्या या आलिशान आणि हायटेक सरकारी बसस्टॅंडचे उद्घाटन याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सुरवातीला केवळ व्हॉल्वो बसेसना परवानगी देण्यात आली होती. आता सर्व प्रकारच्या बसेस येथून सुटतात. दररोज सुमारे 45 हजार प्रवासी या बसस्टॅंडवर येतात.
2.5 लाख वर्गफुट जागेवर असलेल्या या बसस्टॅंडची निर्मिती करण्यासाठी 110 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर आणखी एका खासगी कंपनीला देखभालीचे कंत्राद देण्यात आले आहे.
एअरपोर्टसारख्या आहेत सुविधा
- दोन मजली अत्याधुनिक पार्किंग
- 50 अद्ययावत डिलक्स वेटिंग रुम्स
- आंतरराष्ट्रीय दर्जाची एअरकंडीशन वेटिंग रुम
- लगेजसाठी ट्राली व्हीलचेअर सारख्या सुविधा.
- रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्टमध्ये असतात तसे सामान ठेवण्यासाठी ब्लॉक रुम.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, बडोद्यातील हायटेक बसस्टॅंडी छायाचित्रे...