अहमदाबाद - 'कुछ दिन तो गुजारिए गुजरात में...' बॉलीवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा संवाद असलेली ही जाहिरात आपण ऐकली असेल. गुजरात आहेच असे राज्य. तेथे ठिकठिकाणी सुंदर ऐतिहासिक इमारती, स्थळं पाहायला मिळतात. कोणीही गुजरातच्या प्रेमात पडावं असा निसर्गही या राज्यात आहे. 19 ते 25 नोव्हेंबर या कालावधित वर्ल्ड हेरिटेज वीक साजरा होतो. त्यानिमित्ताने जाणून घेऊया. अहमदाबादच्या ऐतिहासिक आणि अद्भुत मशिदींबद्दल.
फोटोमध्ये असलेली ही अहमदाबादमधील 'सीधी बशीर' मशीद आहे. 'झूलती मीनार' नावानेही या मशिदीला ओळखले जाते. येथील मशिदींच्या बांधकामात अभियंत्यांचे कौशल्य पाहून कोणीही अवाक होईल. आर्किटेक्टच्या दुनियेत ही मशीद म्हणजे आश्चर्य आहे. येथील झुलणा-या मिनारी आजही एक रहस्यच आहेत. या मिनारींबाबत अभियंत्यांची विविध मतं आहेत. पण या आर्किटेक्टचे खरे रहस्य ते आजपर्यंत समजू शकले नाहीत. ब्रिटीश कालात या मशिदींचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटन अभियंते बोलावण्यात आले होते. पण त्यांनाही या रहस्यात काही गवसले नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर मशिदींच्या बांधकामाचे वैशिष्ट्ये..