आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run In Ahmedabad Doctors Son Vismay Shah Gets 5 Years Jail

हिट अँड रन: लक्झरी कारने आला, पोलिसांच्या जीपने तुरुंगात गेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लक्झरी कारने कोर्टात आलेला आरोपी निकालानंतर पोलिसांच्या गाडीत बसला. - Divya Marathi
लक्झरी कारने कोर्टात आलेला आरोपी निकालानंतर पोलिसांच्या गाडीत बसला.
अहमदाबाद - गुजरातमधील बहुचर्चित बीएमडब्ल्यू हिट अँड रन प्रकरणात येथील जिल्हा न्यायालयाने आरोपी विस्मय शहाला दोषी ठरवले असून त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचबरोबर पीडित कुटुंबीयांना पाच - पाच लाख रुपयांची भरपाई देण्याचेही आदेश न्यायालयाने िदले आहेत. अहमदाबादेतील एसजी हायवेवर २४ फेब्रुवारी २०१३ रोजी आरोपी विस्मय शहा ताशी सव्वाशे किलोमीटर वेगाने कार चालवत होता. त्या वेळी त्याच्या गाडीने बाइकवरील राहुल पटेल शिवम दवे या दोन तरुणांना उडवले. शिवमचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल रुग्णालयात मरण पावला. विस्मय हा येथील नेत्रचिकित्सकाचा मुलगा आहे. अपघातानंतर तो घटनस्थळावरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले होते.